चहा एके चहा
डोळे उघडले
दिसला चहा
चहा दुणे कप
चहा भोवती सारे गप
चहा त्रिक बशी
चहा पुढे उठबशी
चहा चोक साखर
चहा अन भाकर
चहा पंचे पत्ती
चहाचे राज्य जगावरती
चहा साही दूध
चहाने फ़ुटेल मत विरुध्द
चहा सत्ते पाणी
चहा पाहून खुलली पाहुणी
चहा आठे चाळणी
चहा शिवाय जीवन अळणी
चहा नवे उकळला
साऱ्यांच्या कपात ऒतला
चहा दाही चहाकडे पाहा
अमृततुल्य पिऊन पाहा

No comments:
Post a Comment