आज दिवस चौदा नोव्हेंबरचा
वाढदिवस नेहरू चाचांचा
आवडते होते नेते आमचे
पहिले पंतप्रधान भारताचे
मोतीलाल धोरणी पिता
स्वरूपराणी सदगुणी माता
जवाहरलाल तयांचे पुत्र
सर्व जगाचे होते मित्र
स्वातंत्र्यास्तव जे लढले
भारतास उन्नत केले
लाल गुलाबाचे आवडते फ़ुल
प्रेमे घातली सर्वांना भूल
शांतिदुत जे जगती ठरले
कीर्तिरूपे अमर जाहले
