/*
माझ्या शब्दफ़ुलांवर आपले स्वागत आहे

तुमचे मत कळवा

Friday, November 14, 2008

आमचे आवडते नेहरूचाचा


आज दिवस चौदा नोव्हेंबरचा

वाढदिवस नेहरू चाचांचा

आवडते होते नेते आमचे

पहिले पंतप्रधान भारताचे

मोतीलाल धोरणी पिता

स्वरूपराणी सदगुणी माता

जवाहरलाल तयांचे पुत्र

सर्व जगाचे होते मित्र

स्वातंत्र्यास्तव जे लढले

भारतास उन्नत केले

लाल गुलाबाचे आवडते फ़ुल

प्रेमे घातली सर्वांना भूल

शांतिदुत जे जगती ठरले

कीर्तिरूपे अमर जाहले

1 comment:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

चाचा नेहरूंबद्दल अतिशय सुंदर लिहिलं आहे. किप ईट अप.