कपाटातील पुस्तकांचा सुरू झाला
सुरू झाला
कल्ला....
एक दुसऱ्यावरी करू
लागले हल्ला....
भूगोलाचे पुस्तक म्हणाले
पृथ्वी आकाराने गोल
साऱ्या जगाला वाटे
माझे अधिक मोल
मराठीच्या पुस्तकाने सारा
गोंधळ केला
कविता म्हणून बिचारा
दमून गेला
चित्रकलेचे पुस्तक फ़ुगवून
छाती
कंटाळा आला की घेतात
मला हाती
गणिताचे पुस्तक म्हणाले माझ्यामुळे
चाले व्यवहार
तेव्हा माझी कधीच होणार
नाही हार
विज्ञानाचे पुस्तक म्हणाले
मीच लावतो
नवे शोध
विद्यार्थी नि शिक्षक घेतात
माझेच बोध
भांडण चालू असतांना
शाळेची
वाजली घंटा
तेव्हाच कुठे पुस्तकांचा
कमी झाला तंटा

1 comment:
वा छानच होतं पुस्तकांचं भांडण. बरी सुटी झाली अन थांबलं ते .
Post a Comment